24 September 2020

News Flash

साडेचार लाखांचा गुटखा कोल्हापुरात जप्त

या प्रकरणी श्रीशैल सदाशिव वाळवेकर (वय २२, रा. खंजिरे मळा) याला ताब्यात घेतले आहे.

इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाणे आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी केलेल्या कारवाईत वाहनासह ४ लाख ५८ हजार रुपयांचा विनापरवाना तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी श्रीशैल सदाशिव वाळवेकर (वय २२, रा. खंजिरे मळा) याला ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास गावभाग पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना जिल्हा सत्र न्यायालयासमोर श्रीशैल वाळवेकर हा छोटा हत्ती वाहनातून जात असताना संशय आल्याने थांबविण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करता गाडीमध्ये स्टार पानमसाला, आरएमडी पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:36 am

Web Title: gutkha worth rs 4 lakh seized in kolhapur district
Next Stories
1 लाच स्वीकारणाऱ्या पोलिसास सक्तमजुरी
2 ‘मराठा मतपेटीसाठी पवारांची टीका’
3 कोल्हापुरात सर्वत्र पावसाचे आगमन
Just Now!
X