बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण, पण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण ही विस्मय करायला लावणारी घटना घडली आहे, ती करवीरनगरीतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत. शीतल महादेव वाली हा विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५८०वी रँक मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तब्बल सात वष्रे अविश्रांत कष्ट घेतल्यानंतर हे यश त्याने मिळविले आहे. पण हाच विद्यार्थी एकेकाळी चक्क बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. एखादे अपयश म्हणजे प्रगती खुंटली असा गरसमज करुन घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शीतलचे लख्ख यश प्रेरणादायी ठरावे.
येथील नागाळा पार्कमध्ये वाली कुटुंबीय राहण्यास आहे. शीतल यास वाचन, प्रवास आणि व्यायाम याची आवड. सुदृढ शरीरयष्टीसाठी दंड-बठका मारणाऱ्या शीतलने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेतही यश मिळविण्यासाठी अशीच कठोर मेहनत केली. विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली तेव्हा शीतल अनुत्तीर्ण झाला होता. त्यामुळे खचून न जाता त्याने नव्याने परीक्षा देत ७१ टक्के गुणांची कमाई केली. नंतर तो विधी शाखेकडे वळला. तेथे तो विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. येथेच त्याला युपीएससी परीक्षेकडे वळण्याचा मौलिक विचार मिळाला. त्याला शिकविणाऱ्या प्रा. दीपा विचारे यांनी त्याला या परीक्षेसाठी बसण्यासाठी प्रवृत्त करण्याबरोबरच मार्गदर्शन केले. शीतलनेही त्यासाठी थेट नवी दिल्ली गाठली. तेथे चार वष्रे या परीक्षेचा अभ्यास करण्यामध्ये घालवली.
सन २०१० मध्ये शीतलने यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली. मुलाखतही झाली. परंतु, पोस्टींग मात्र मिळाले नाही. त्यानंतरच्या दोन्ही वर्षांच्या परीक्षांना तो सामोरे गेला, पण यशाने हुलकावणी दिली. २०१३ मध्ये मुख्य परीक्षा देवूनही यश हाती आले नाही. पुढच्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संरक्षण दलात पोस्ट मिळाली. या क्षेत्राकडे वळायचे नसल्याने गतवर्षी पुन्हा परीक्षा दिली. परीक्षेची सप्तपदी फळास येऊन यंदा तो उत्तीर्ण झाला आहे. शीतलचा हा सारा प्रवास यशाने मात करता येते हे सिध्द करणारा आहे. शीतलही संदेश देताना हेच म्हणतो की, शैक्षणिक टप्प्यावर बारावीची परीक्षा महत्त्वाची असली तरी त्यावरच सारे काही अवलंबून नसते. त्याच्याही पलिकडे असणाऱ्या संधीकडे नीटपणे पाहिले पाहीजे. पूवर्ीेच्या चुका झाकून प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश तुमचेच असते.
शीतल वाली मूळचा ग्रामीण भागातील गडिहग्लज तालुक्यातील नेसरी गावचा. शाहू महाविद्यालयातील नोकरीच्या निमित्ताने त्याचे वडील प्रा. महादेव वाली हे कोल्हापुरात स्थायिक झाले. त्याची आई वृषाली या न्यायालयामध्ये लिपिक पदावरुन सेवानिवृत्त झाल्या आहेत. येथील विद्यापीठ हायस्कूलमधून दहावी परीक्षा ७४ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मेन राजाराम हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला होता.
शीतल वाली