19 September 2020

News Flash

कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी

धरण क्षेत्रात दमदार तर शहरासह पूर्वेकडील भागात अधून मधून येणाऱ्या सरी असे पावसाचे रूप राहिले आहे.

धरण क्षेत्रात दमदार तर शहरासह पूर्वेकडील भागात अधून मधून येणाऱ्या सरी असे पावसाचे रूप राहिले आहे. नदी, धरण यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र पाऊस पडला असला तरी तो सर्वाधिक गगनबावडय़ात ५६ मि.मी. इतका पडला आहे.

जिल्ह्य़ात पावसाने अंग धरण्यास सुरुवात केली आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात जोरदार सरी कोसळत आहेत.  गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधित ५६ मि. मी. तर, जिल्ह्य़ात काल दिवसभरात सरासरी २२.७३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्य़ात १ जूनपासून आतापर्यंत एकूण २२८७.५१ मि. मि. पाऊस झाला आहे. काल झालेला तालुकानिहाय पाऊस मि.मी मध्ये पुढील प्रमाणे आहे- गगनबावडा ५६, करवीर ९.५४, कागल १५.५७, पन्हाळा १३.५७, शाहूवाडी १६, हातकणंगले ३.५०, शिरोळ २.८५,  राधानगरी २२.८३, भुदरगड ३७.२०, गडिहग्लज २५.२८, आजरा ३१.७५ व चंदगडमध्ये ३८.६६ मि.मी. अशी एकूण २७२.७५ मि. मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्य़ातील सर्वच धरणांतील पाणी साठय़ामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होताना  दिसत आहे. धरणातील पाणीसाठय़ाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये), पूर्णसंचय पाणीसाठा मीटरमध्ये कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. राधानगरी – ४२.९५ (५९०.९८), तुळशी २२.५९ (६१६.९१), वारणा २०९.५७ (६२६.९०), दुधगंगा २५.९७ (६४६), कासारी १२.५० (६२३.००), कडवी ३०.३२ (६०१.२५), कुंभी २९.४८ (६१२.२०), पाटगाव २१.३२ (६२६.६०), चिकोत्रा ४.१० (६८८.००), चित्री ६.२७ (७१८.९०), जंगमहट्टी ३.५३ (७२६.२०), घटप्रभा ३५.६५ (७४२.३५), जांबरे १.७१ (७३७.००) कोदे ल. पा. १.८८ (१२२.०).

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:39 am

Web Title: heavy rainfall in kolhapur
Next Stories
1 नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम
2 साडेचार लाखांचा गुटखा कोल्हापुरात जप्त
3 लाच स्वीकारणाऱ्या पोलिसास सक्तमजुरी
Just Now!
X