News Flash

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

आज दुपारनंतर कोल्हापूर शहरात मुसळधारपावसाने सर्वत्र जलमय वातावरण झाले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असताना गुरुवारी एका भिंत कोसळल्याने एका दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. गडहिंग्लज तालुक्यात ही घटना घडली. जिल्ह्यात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्व भाग आज मुसळधार पाऊस झाला.

यंदा मुबलक पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनचे राज्यात आगमन काहीशी उशिरा होणार असल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. तथापि जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज दुपारनंतर कोल्हापूर शहरात मुसळधारपावसाने सर्वत्र जलमय वातावरण झाले.

शहरासह ग्रामीण भागालाही पावसाने झोडपून काढले. शेत कामाला वेग आला असताना पावसाने हजेरी लावल्याने खरीप चांगलाहात देईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत व्यक्त करीत आहेत.

भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

जोरदार पावसामुळे भिंत कोसळून तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी गडहिंग्लज तालुक्यात घडली. गिरीजा कांबळे, अजित कांबळे व संगीता कांबळे (तिघांचे वय सुमारे ४० वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. नांगणुर या गावचे हे तिघे रहिवाशी मुंगळी या गावी शेतमजुरीचे काम आटोपून गावाकडे परतत होते. मध्येच जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे ते रस्त्यालगत असलेल्या एका कुक्कुट पालन प्रकल्पाच्या ठिकाणी थांबले. त्याची कोसळून हे तिघेही त्यामध्ये गाढले गेले.  त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 2:48 am

Web Title: heavy rains in kolhapur zws 70
Next Stories
1 १०५ वर्षांची वृद्धा करोनामुक्त
2 महापुरावर अद्याप काथ्याकूटच
3 आगामी हंगामातही साखर उद्योगासमोर अतिरिक्त साठ्याची चिंता
Just Now!
X