िहदू एकता आंदोलन व िहदू युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने िहदुत्ववादी संघटनांतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी शहरातून मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

िहदू युवा प्रतिष्ठानच्या मशाल मिरवणुकीचे उद्घाटन मिरजकर तिकटी येथे सायंकाळी भिकाजी इंगवले यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून झाले. या वेळी अँड. धनंजय पठाडे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, उमा इंगळे, आर. डी. पाटील, भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव, अ‍ॅड. संपतराव पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, दीपक मगदूम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

निवृत्ती चौक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी  ‘जय भवानी.. जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. हर हर महादेव.. वंदे मातरम्.. भारतमाता की जय.. िहदुस्थान बचाओ.. देश बचाओ..’ अशा घोषणांचा अखंड जयघोष करण्यात होता.

या वेळी सुरेश जरग, संजय ढाले, महादेव कुकडे, वल्लभ देसाई, मधुमती पावनगडकर, रघुनाथ भोईटे, दीपक पेटकर, योगेश सणगर उपस्थित होते.

िहदू एकता आंदोलनाच्या मशाल मिरवणुकीचे हे ३५ वे वर्ष आहे. निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड यांच्या हस्ते मशाल प्रज्वलनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी प्रांत सरचिटणीस लालासाो गायकवाड, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, शिवाजीराव ससे, िहदुराव शेळके, अशोक पोवार, किशोर घाटगे, जयदीप शेळके, जयकुमार िशदे, किसन कल्याणकर, नंदू अहिर आदी उपस्थित होते. शिवाजी चौक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.