News Flash

सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये शिकाऱ्यांच्या टोळय़ा

सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर शिकाऱ्यांच्या टोळय़ा कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, कोणत्याही परिस्थितीत वन्यजीवांची शिकार होता कामा नये यासाठी वनखात्याने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये शिकाऱ्यांच्या टोळय़ा

सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर शिकाऱ्यांच्या टोळय़ा कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, कोणत्याही परिस्थितीत वन्यजीवांची शिकार होता कामा नये यासाठी वनखात्याने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. कालच शिकाऱ्यांच्या एका टोळीला वनअधिकाऱ्यांच्या पथकाने हटकले असता, या टोळीने ४० गावठी बाँबसह शिकारीचे साहित्य जागीच टाकून धूम ठोकली. या पाश्र्वभूमीवर अधिक माहिती घेता, रानडुकरे, ससे आदी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी पाटण तालुक्यातील वनविभागात टोळय़ांचा वावर वाढल्याचे स्थानिक लोकांकडून सांगितले जात आहे.
वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पारधी समाजातील टोळय़ा पाटण तालुक्यात आल्याची माहिती पाटण वन विभागाला मिळाली. त्यावरून काल शनिवारी कुसरूंड, मोरगिरी, पिंपळोशी परिसरात शिकारीसाठी सज्ज असलेल्या एका टोळीला सहायक वनसंरक्षक एस. एम. मुळे, पाटण वन विभागाचे वनक्षेत्रपाल व्ही. आर. काळे यांच्या पथकाने हटकले. त्यादरम्यान त्यांच्याकडे शिकारीसाठी वापरण्यात येणारी धारदार शस्त्रे, ४० गावठी बाँबगोळे, ससे पकडण्याचे पिंजरे वन विभागाने हस्तगत केले. टोळीत महिलांचा सहभाग मोठा असून, कारवाईवेळी टोळीतील पुरूष मात्र पसार झाले. तालुक्यात वन्यजीव प्राण्यांच्या शिकारीसाठी पारधी समाजातील टोळय़ा कोयना, मोरगिरी, केरळ, बोंद्री, पिंपोळशी परिसरात कार्यरत असल्याची माहिती वनक्षेत्रपाल व्ही. आर. काळे यांना मिळाली. या टोळय़ांकडून रानडुक्कर, माकडे, काळवीट, मोर, लांडोर, ल्हावे, ससे, मोर आदी प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस पाटण, मोरगिरी, कोयना बाजारात अथवा आसपासच्या खेडेगावात विक्री केले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कुसरूंड परिसरात शिकारीसाठी एक टोळी दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तेथे छापा टाकला. दरम्यान, यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना वनक्षेत्रपाल व्ही. आर. काळे म्हणाले, की शिकाऱ्यांच्या टोळय़ा तत्काळ जेरबंद करण्यासाठी आम्ही सतर्क असून, गावोगावी लोकांना विश्वासात घेऊन शिकाऱ्यांच्या हालचालीसंदर्भात माहिती घेतली जात आहे. काही लोक विश्वसनीय माहिती पुरवत असल्याने काल शिकाऱ्यांच्या या टोळीला गाठणे शक्य झाले. मात्र, हे शिकारी पळून जाताना त्यांच्यातील महिलांना आमच्या पथकाच्या अंगावर हल्ला करण्यास भाग पाडत आहेत. परिणामी आम्हाला या पारधी शिकाऱ्यांना रंगेहाथ पकडणे शक्य होत नसले तरी आम्ही लवकरच व्यापक मोहीम हाती घेऊन वन्यप्राण्यांना शिकाऱ्यांचे कंबरडे मोडून काढू असा विश्वास काळे यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 2:10 am

Web Title: hunter gang in sahyadri ghats
Next Stories
1 महाडीकांना काँग्रेसबरोबर राहण्यास सांगूनही निवडणुकीत दाखल – पतंगराव कदम
2 पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना लढण्याची प्रेरणा दिली
3 देशातील ८० टक्के दुचाकींचे काबोरेटर्स इचलकरंजीत बनतात
Just Now!
X