News Flash

कोल्हापूरच्या प्रशासनात दोन प्रमुख पदं पती-पत्नीकडे; कादंबरी बलकवडे महापालिका आयुक्त

पत्नी आयएएस तर पती आहेत आयपीएस अधिकारी

कोल्हापूर : कादंबरी बलकवडे यांनी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे स्विकारली.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनात दोन प्रमुख पदे पती-पत्नीकडे असणार आहेत. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी गेल्या आठवड्यात शैलेश बलकवडे यांची नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी त्यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे यांची कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी निवड झाली असून त्यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला. त्या गोंदियाच्या जिल्ह्याधिकारी होत्या.

महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. त्यांनी दर रविवारी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानाने गेल्या रविवारी ७५ आठवडे पूर्ण केले होते. ही त्यांची चांगली कामगिरी वगळता महापालिकेतील बरेचसे प्रश्न प्रलंबित राहिले. महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोसले यांच्या हस्ते कलशेट्टी यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला. त्यानंतर लगेचच बलकवडे यांची महापालिकेत एन्ट्री झाली आणि कलशेट्टी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहरात कामाची संधी मिळणे हे आपलं भाग्य असून पारदर्शक कामाला प्राधान्य राहील,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कलशेट्टी जिल्हा परिषदेत?

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली झाली असली तरी त्यांची नवीन जबाबदारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची बदली होणार असून तेथे कलशेट्टी यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 8:36 pm

Web Title: husband and wife hold two major positions in the administration of kolhapur kadambari balkwade municipal commissioner aau 85
Next Stories
1 उदयनराजेंवर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात कोल्हापुरात निदर्शने
2 विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे नवीन कुलगुरूंसमोर आव्हान
3 साखर उद्योगाच्या अडचणींमध्ये वाढ  
Just Now!
X