30 October 2020

News Flash

ऊसतोड मजूर महिला खूनप्रकरणी पतीस अटक

अनैतिक संबंधाचा संशय

माथेफिरुने त्या तरुणीवर एक - दोन नव्हे तर तब्बल २१ वेळा चाकूने वार केले.

इचलकरंजीत येथील ऊसतोड मजूर महिला संगीता गायकवाड हिच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आराेपी तिचा पती रंगनाथ निवृत्ती गायकवाड (वय ३०, रा. खालापुरी, जि. जालना) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बुधवार, २ मार्च रोजी जुना चंदूर रोड परिसरातील पाटील मळ्यात संगीता गायकवाड हिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत फिर्यादी मुकादम रामनाथ बरडे याला अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून संगीताचा पती रंगनाथ याने खून केल्याचे सांगितले होते. त्या वेळी मुकादम बरडे हाही सोबत होता. बरडे याला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केली. तर या प्रकरणातील फरार असलेला पती रंगनाथ याला आज शिवाजीनगर पोलिसांनी खालापुरी येथून अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 3:00 am

Web Title: husband arrested in sugarcane woman worker murder case
Next Stories
1 ‘केशवराव भोसले नाटय़गृहाचा सांभाळ करा, स्वच्छता ठेवा, मागण्या टाळा’
2 कोल्हापुरात महिला महोत्सवास प्रारंभ
3 सराफी दुकाने बंदमुळे ग्राहकांची गैरसोय
Just Now!
X