25 February 2021

News Flash

पत्नीकडून डोक्यात हातोडा घालून पतीचा खून

लॉकडाउनच्या काळात घरीच असलेल्या पतीकडून चारित्र्यावर घेतला जात होता संशय

कोल्हापूर : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या संजय घेवडे यांच्या डोक्यात हातोडा मारुन पत्नीने त्यांचा खून केला.

चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने वैतागून पत्नीने रागाच्याभरात पतीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून खून केला. रविवारी रात्री दहाच्या सुमारास जाखले (ता. पन्हाळा) येथे ही घटना घडली. मृत व्यक्ती ही वारणा कामगार सोसायटीची संचालक होती. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी पत्नीला अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय तुकाराम घेवदे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर पत्नी संगीता घेवदे असे आरोपी महिलेचं नाव आहे. शिराळा तालुक्यात अंत्री गावाचे असणारे संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी असल्याने जाखले येथे वास्तव्यास आहेत.

टाळेबंदीमुळे काम बंद असल्याने ते घरीच होते. या काळात ते पत्नी संगिता यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत राहिले. रविवारी रात्रीही याच कारणास्तव दोघाच्यात जोरदार वाद आणि मारामारी झाली. झटापटीत संजय हे खाली पडल्यावर संगीताने राग असह्य झाल्याने तीनदा हातोडा त्यांच्या डोक्यात मारला. वर्मी घाव बसल्याने संजयचा अतिरक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला.

या घटनेचा कोडोली पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, आज सकाळी पत्नी संगीताला पोलिसांनी अटक केली. पन्हाळा न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 7:45 pm

Web Title: husband murdered by wife with hammer hits on head aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांकडून अत्याचार करून चिमुकलीचा खून
2 तीन मंत्र्यांच्या तीन तऱ्हा
3 कोल्हापूर : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांना ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर
Just Now!
X