24 September 2020

News Flash

लढवय्या नेतृत्व… वयाच्या नव्वदाव्या वर्षी महाराष्ट्रातील माजी मंत्र्याची करोनावर मात

कोल्हापूरात करोनाचा संसर्गात वाढ

माजी खासदार,माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी ९० व्या वर्षी करोनावर मात केली. आज त्यांचे रुग्णालयातून इचलकरंजीतील निवास्थानी कुटुंबीयांनी उत्साहात स्वागत केले.यावेळी फुलांच्या पायघड्या अंथरल्या आल्या होत्या. फुलांचा वर्षाव करून आवाडे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर त्याचा संसर्ग आवाडे परिवाराला बसला. माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे,त्यांचे सुपुत्र स्वप्नील आवाडे,जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीच्या माजी अध्यक्ष सपना आवाडे यांच्यासह कुटुंबातील बहुतेक सर्व सदस्यांना तसेच घर व कार्यालयातील काही कर्मचारी वर्ग यांना बाधा झाली होती.

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनाही लागण झाली होती. आवाडे कुटुंबातील बहुतेक सदस्य इचलकरंजी येथील अलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. कल्लाप्पांना आवाडे व प्रकाश आवडे हे दोघेही एकाच वेळी तेथे उपचार घेत होते. प्रकाश आवाडे हे चार दिवसापूर्वी करोनावर मात करून घरी परतले होते.तर आज कल्लाप्पाण्णा आवाडे यांना रुग्णालयातून बरे झाल्याने निरोप देण्यात आला.
इचलकरंजीतील इंदू कला या निवासस्थानी कल्लाप्पांना आवाडे यांचे कुटुंबयांनी उत्साहात स्वागत केले. ते घरी परतत असल्याच्या आनंदा प्रित्यर्थ फुलांच्या पायघड्या अंथरंगात आल्या होत्या. परिवारातील महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.त्यांना कुंकुमतिलक लावण्यात आला. प्रकाश आवाडे, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन कल्लाप्पांना आवाडे यांचे स्वागत केले. आवाडे कुटुंबातील सर्व सदस्य करोना मुक्त झाल्याचा आनंद आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. इचलकरंजी शहर करोनामुक्त व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 1:09 pm

Web Title: ichalkarangi kallappanna awade coronafree nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूर शहरात जनता संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद
2 कोल्हापुरात संचारबंदीवरून वातावरण तप्त
3 कोल्हापूरातील जनता संचारबंदीला खासदार संभाजीराजे यांचा विरोध
Just Now!
X