News Flash

‘गेट’ परीक्षेत इचलकरंजीची अश्विनी कणेकर पहिली

डीकेटीई’ शिक्षण संस्थेची बी. टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्रीची विद्यार्थिनी

(संग्रहित छायाचित्र)

इचलकरंजी येथील अश्विनी कणेकर ही ‘गेट’ परीक्षेमध्ये देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ती ‘डीकेटीई’ शिक्षण संस्थेची बी. टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्रीची विद्यार्थिनी आहे. यावर्षी संस्थेचे ३६ विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

गेट (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनीअरिंग) ही परीक्षा आय.आय.टी. मार्फत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे बौद्धिक कौशल्य तपासले जाते. नामांकित संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घ्यावयाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवा आणि सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी प्राधान्य दिले जाते. यावर्षी साडे सात लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये केवळ १.३५ लाख विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले.  निमशहरी भागातील आणि त्यातही एका मुलीने देश पातळीवर हे यश प्राप्त केल्याने तिचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:18 am

Web Title: ichalkaranji ashwini kanekar came first in the gate exam abn 97
Next Stories
1 महालक्ष्मी, जोतिबा मंदिर विकासाची कामे रेंगाळली
2 गोकुळच्या निवडणुकीसाठी विरोधकांची महाविकास आघाडी
3 ‘गोकुळ’ची निवडणूक अटळ
Just Now!
X