कोल्हापूर : श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने स्मृती जागर सभेत कवी, विचारवंत जावेद अख्तर आणि महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. तुषार गांधी यांची सभा येथे २० फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या खुनापासून सुरू झालेली हिंसेची मालिका डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्यापर्यंत पोहोचली आहे. देशात विचारवंतांच्या खुनांचे सत्र सुरू आहे.

दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावर हिंसा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्मृती जागर सभेत सुप्रसिद्ध कवी, विचारवंत जावेद अख्तर आणि महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. तुषार गांधी हे ‘भारत : नव्या स्वातंत्र्यलढय़ाच्या उंबरठय़ावर’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यंदा पानसरे ५ वा स्मृतिदिन असून शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता सभेच्या सुरुवातीस ‘चायवाले की दुकान’ या नाटिकेचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती श्रमिक प्रतिष्ठानच्या विश्वस्त सदस्य डॉ. मेघा पानसरे यांनी दिली.