करोना संसर्गामुळे जोतिबा देवाची चैत्र यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाली आहे. चैत्र यात्रेच्या आजच्या मुख्य दिवशी जोतिबा डोंगर येथे भाविकांविना पारंपरिक पद्धतीने यात्रेस प्रारंभ झाला. दख्खनचा राजा जोतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा सोमवारी बांधण्यात आली होती.

पहाटे पाच वाजता पन्हाळयाचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. यावेळी देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे उपस्थित होते. राजेशाही थाटातील बैठी महापूजा प्रवीण कापरे, कृष्णात दादर्णे, प्रकाश सांगळे या पुजाऱ्यांनी बांधली.

Mahashivratri 2024 Date time shubh muhurat puja vidhi signification
Mahashivratri 2024: महाशिवरात्री ८ की ९ मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी

पश्चिाम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेचे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे समाज माध्यमातून थेट प्रसारण केले. सायंकाळी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देवाचा पालखी सोहळा निघाला. डोंगरावर मोठा पोलीस बंदोबस्त असून सर्व रस्ते बंद केले आहेत.

करोनाचे विघ्न

जोतिबा यात्रेनिमित्त पूजा विधि मानकरी, पुजारी यांच्या उपस्थितीत झाली. २१ मानकऱ्यांपैकी पाच जण करोना सकारात्मक झाले. २० टक्के मानकरी सकारात्मक आल्याची दखल घेऊन भाविकांची गर्दी होणार नाही याची विशेष दक्षता जिल्हा प्रशासनाने व पोलीस विभागाने घेतली होती.