News Flash

कराडचे तापमान चाळिशीपार; असह्य झळांमुळे सारेच अस्वस्थ

कराड शहर व परिसरात रविवारी तापमानाचा पारा प्रथमच चाळिशीपार झाल्याने कराडकर अक्षरश: हैराण झाले आहेत. असेच वातावरण नजीकच्या परिसरात असून, त्याचा विपरीत परिणाम बाजारपेठांवर दिसून

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कराड शहर व परिसरात रविवारी तापमानाचा पारा प्रथमच चाळिशीपार झाल्याने कराडकर अक्षरश: हैराण झाले आहेत. असेच वातावरण नजीकच्या परिसरात असून, त्याचा विपरीत परिणाम बाजारपेठांवर दिसून येत आहे. कमालीच्या उष्म्यामुळे दुपारच्या प्रहरी बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. प्रथमच इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागल्याने लोकांना उष्णतेचा त्रास असह्य ठरू लागला आहे.
विशेष म्हणजे पाण्याचा सुकाळ म्हणून ओळख असलेल्या कृष्णा-कोयनेच्या काठावरही ओढे, नाले पूर्णत: कोरडे पडून असून, विहिरी, कूपनलिकांसह भूगर्भातील पाणीपातळी खालवल्याने त्याचा शेतपिकांवर व पिण्यासाठीच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. कराड तालुक्यातील सुमारे ५० गावे टंचाईग्रस्त असून, वाढत्या तापमानामुळे शारीरिकदृष्टय़ा कमकुवत लोक हवालदिल असल्याने एकंदरच समाजजीवन अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2016 2:30 am

Web Title: karad temperature out of fourty
टॅग : Karad,Temperature
Next Stories
1 पितृत्व सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणीस परवानगी
2 वरिष्ठांच्या छळाला वैतागून पोलीस शिपायाची आत्महत्या?
3 सराफांचा प्रश्न सरकारने सोडवावा- उद्धव ठाकरे
Just Now!
X