कलबुर्गी हत्याप्रकरण

दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये सनातनचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे व समीर गायकवाड यांचा सहभाग तपासण्यासाठी कर्नाटक पोलिसांचे विशेष पथक बुधवारी कोल्हापुरात आले होते. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत याबाबत प्रदीर्घ चर्चा केली. तर, तावडे याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल हिंदू जनजागृती समितीचे शिष्टमंडळ अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.पी. यादव यांना भेटले असता त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, तावडे याची पोलीस कोठडीची मुदत  संपत असल्याने त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.

कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी तपासासाठी एक विशेष पथक बनवले आहे. या पथकाचे प्रमुख हेमंत निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापुरला भेट दिली. हे पथक आणि विश्वास नांगरे-पाटील व अन्य अधिकारी यांच्यात  दीर्घ चर्चा झाली. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये सनातनचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे व समीर गायकवाड यांचा सहभाग कितपत आहे, याविषयी तपासाच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली. तिन्ही हत्यांमध्ये कोणते साधम्र्य आहे, याविषयी माहिती घेण्यात आली.

सनातनचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक. एस.पी. यादव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.  िहदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेक आदींनी मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली. यादव यांनी तावडेला झालेल्या मारहाणीविषयी लक्ष घालतो. रवी पाटील हे पोलीस अधिकारी सीबीआयचे असले तरी त्यांनी कोल्हापुरात येऊन मारहाण करणे योग्य नाही. यात आपण पूर्ण लक्ष घालून तावडेला आवश्यक ती सुरक्षा देणार असल्याचे सांगितले. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी तपासासाठी एक विशेष पथक बनवले आहे. या पथकाचे प्रमुख हेमंत निंबाळकर आहेत