कोल्हापूर शहरातील केएमटी बसच्या अपघाताचे तीव्र पडसाद सोमवारी शहरात उमटले आहेत. रविवारी रात्री पापाची तिकटी येथे झालेल्या ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसून मोठा अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण असल्याने बस सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे बस सेवेतील १२९ बसेस आज रस्त्यावर धावू शकल्या नाहीत . परिणामी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. दरम्यान , अपघातास कारणीभूत चालक रंगराव पांडुरंग पाटील याला निलंबित करण्यात आले. या बैठकीत आयुक्तांनी वाहतूक नियंत्रक रवींद्र धुपकर आणि वर्क शॉप अभियंता एम.डी.सावंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

सकाळपासून बंद असलेली केएमटी फेऱ्या पूर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या अपघातात मृत व्यक्तींच्या संतप्त नातेवाईकांनी वर्क शॉप समोर धरणे करत वर्कशॉपमधून बाहेर येणाऱ्या बसेसची अडवणूक केली. बसेस रस्त्यावर उतरल्या तर बसेसची तोडफोड करण्याचा इशारा हा दिला. रविवारी झालेल्या अपघाताची गंभीर नोंद घेत सोमवारी शास्त्री नगर येथे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पदाधिकारी आणि सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. केएमटीच्या कर्मचाऱ्यांनी बस सेवेतील अनागोंदी, नियोजनाचा अभाव याचा पाढा वाचला. त्यावर अपघातास कारणीभूत चालक रंगराव पांडुरंग पाटील याला निलंबित करण्यात आले. बस सेवेतील बस वेळापत्रकात गोंधळ घालणारे वाहतूक नियंत्रक रवींद्र धुपकर आणि तांत्रिक दोषाला कारणीभूत ठरलेले वर्क शॉप अभियंता एम.डी.सावंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

राजारामपुरी भागात तणाव
या अपघातात मृत पावलेले महापालिकेतील सफाई कर्मचारी तानाजी भाऊ साठे (वय ४२) आणि सुजल भानुदास अवघडे (वय १५) दोघे रा. राजारामपुरी ३ री गल्ली येथील असल्याने आज राजारामपुरीत बाजार पेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या अपघातात १८ जण जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील दोन्ही मृत व्यक्ती राजारामपुरीतील असल्यामुळे आज या परिसरातील सर्व दुकानदारांनी सकाळ पासूनच बंद पाळला. राजारामपुरी शहरातील मोठी बाजार पेठ असून परिसरात शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, महापालिकेच्यावतीने मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख व जखमी व्यक्तींना प्रत्येकी १लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्र्यांकडून पाहणी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच साठे आणि अवघडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी ते म्हणाले की, या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेच, त्याचबरोबर या परिसरात मिरवणूक असताना केएमटी तसेच अवजड वाहनाची वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी कशी काय देण्यात आली, याची चौकशी करून दोषींवरही कडक कारवाई करण्यात येईल. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, राहुल चिकोडे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पो. निरीक्षक संजय साळुंखे उपस्थित होते.