News Flash

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण, पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

कॉन्स्टेबलने जातीवरून शिवीगाळ केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

संग्रहित छायाचित्र

लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण केल्याबद्दल येथील जलद प्रतिसाद पथकात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शोषण झालेल्या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नीलेश नामदेव पडवळ (वय ३५, रा. पडवळवाडी, ता. करवीर) असे गुन्हा दाखल झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, पडवळ याने खासगी नोकरी करणाऱ्या घटस्फोटित फिर्यादी महिलेची समाज माध्यमातून ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर डिसेंबर २०१६ ते ११ जून २०२० या काळात तिला लग्नाचे आमिष दाखवत विविध ठिकाणी नेवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याशिवाय चारवेळा गर्भपात करण्यास तिला भाग पाडले.

लग्न करण्याबाबत विचारणा केल्यानंतर पडवळ याने आपल्याला जातीवरून शिवीगाळ करीत अपमानित केले, असा उल्लेखही पीडितेने फिर्यादीत केला आहे. या महिलेने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पडवळ हा पसार झाला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पडवळवरील लैंगिक अत्याचाऱ्याच्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास तातडीने त्याच्यावर अटकेची व निलंबनाची कारवाई होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 6:36 pm

Web Title: kolhapur a case has been registered against a police constable for sexually abusing a woman on the pretext of marriage aau 85
Next Stories
1 कोल्हापुरात पावसाचा वेग वाढला; राजाराम, शिंगणापूर बंधारे वाहतुकीसाठी बंद
2 राज्यातील आघाडी सरकारने जनतेला साडेसात हजार रुपये द्यावेत; भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा
3 कोल्हापूर : ऊसाच्या काट्यावरुन रंगला कलगीतुरा; मुश्रीफांवर महाडिकांच्या आरोपांनी खळबळ
Just Now!
X