24 October 2020

News Flash

कोल्हापूर : ‘CAIT’ चिनी वस्तूंवरील बहिष्काराची तीव्रता वाढवणार

सीमेवर जवानांच्या मृत्यूनंतर घेतला निर्णय

लोगो

लडाख भागातील सीमेवर चीनकडून सुरू असलेली आगळीक आणि २० भारतीय जवानांच्या मृत्युच्या पार्श्‍वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) तर्फे सुरू असलेल्या चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या आंदोनलाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याची माहीती कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी यांनी बुधवारी दिली. सोमवारी झालेल्या चीन सीमेवर २० भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त समजल्यावर देशात संतापाची लाट उसळली आहे.

सरकार व लष्कर त्यांच्या पध्दतीने याला उत्तर देईलच परंतू देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने जनतेनेही आपल्या पध्दतीने या प्रकाराला उत्तर द्यावे अशा अपेक्षेने कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतीया, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी, उपाध्यक्ष धैर्यशील पाटील व अन्य पदाधिकार्‍यांनी चीनच्या या आगळीकीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

तसेच चिनी वस्तुंवरील बहिष्काराचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. तसेच बहिष्कारच्या नवीन वस्तूंची यादी जाहीर केली. पेटीएम, बिग बास्केट, स्विग्गी, फ्लिपकार्ट सारख्या भारतीय कंपन्यांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ही आगामी आर्थिक आक्रमणाची नांदीच आहे. त्यामुळे सरकारने चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर तात्काळ कठोर निर्बंध लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 8:40 pm

Web Title: kolhapur cat will intensify boycott on chinese goods aau 85
Next Stories
1 कोल्हापूर : पंचगगेच्या पातळीत चोवीस तासात तीन फुटांनी वाढ; जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली
2 विधानपरिषद उमेदवारीप्रकरणी राजू शेट्टींवर समर्थक, माजी सहकाऱ्यांकडून टीकास्त्र
3 वस्त्रोद्योजकांचा मुख्य हंगाम वाया
Just Now!
X