23 March 2019

News Flash

शिवसेना तटस्थ; कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा महापौर; ताराराणी-भाजपा युतीला धक्का

काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून काँग्रेसच्या शोभे बोंद्रे यांनी ताराराणी- भाजपा युतीच्या उमेदवार रुपराणी निकम यांचा पराभव केला.

शोभा बोंद्रे यांची महौपरपदी निवड झाली.

कोल्हापूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दणका दिला असून शिवसेनेचे चार नगरसेवक निवडणुकीत तटस्थ राहिले. यामुळे काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असून काँग्रेसच्या शोभे बोंद्रे यांनी ताराराणी- भाजपा युतीच्या उमेदवार रुपराणी निकम यांचा पराभव केला. या पराभवामुळे कोल्हापूरमध्ये भाजपाचा महापौर करण्याचे चंद्रकात पाटील यांचे स्वप्नही अधुरेच राहिले.

तीन महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण हे दोन नगरसेवक फुटले आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे आशिष ढवळे विराजमान झाले होते. शुक्रवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठीही भाजपाने कंबर कसली होती.

अडीच वर्षांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपाचा महापौर करण्याची इच्छा अधुरी राहिली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कंबर कसली होती. तर महापौरपद काँग्रेसकडेच राहावे, यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचेही प्रयत्न सुरु होते. चुरशीच्या लढतीत फोडाफोडीचे राजकारण जोरात होते.

शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सूकर झाला. शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले यांनी माघार घेतली. यानंतर झालेल्या मतदानात काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांनी ४४ मते मिळाली. तर निकम यांना ३३ मते पडली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत विजयी झाले. त्यांना ४४ मते मिळाली.

 

First Published on May 25, 2018 12:45 pm

Web Title: kolhapur congress candidate shobha bondre elected as new mayor setback to bjp