19 September 2020

News Flash

कोल्हापूर : २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक शनिवारपर्यंत कार्यान्वित

४५० रुग्णांची दररोज होणार सोय

संग्रहित छायाचित्र

करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरच्या ऑक्सिजन टँक खरेदीला मंजुरी दिली आहे. कोल्हापूर शहरातील सीपीआरमध्ये हा टँक बसविण्यात आला असून दिवसाला ४५० रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार असून शनिवारपर्यंत हा टँक कार्यान्वित होणार आहे.

३० फूट उंच, २ मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक मंगळवारी बसविण्यात आला. यासोबतच ४०० क्युबिक मीटर प्रतीतास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. २० हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील १ लीटर द्रवापासून ८५० लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमध्ये १५ ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नई येथील कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागवला आहे.
सध्या पाईप जोडणीचे काम सुरु असून शनिवारपर्यंत या टँकमधून ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होईल, डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2020 8:56 pm

Web Title: kolhapur cpr gets oxygen gas facility helpful for covid 19 patients treatment psd 91
Next Stories
1 माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे भाजपचे तिसरे पद
2 पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात २ फूट वाढ
3 कोल्हापुरात पावसाचा वेग वाढला, पुन्हा पुराची शक्यता
Just Now!
X