नोटा बदलाचा फटका जिल्हा मध्यवर्ती बँकांना बसू लागल्याने बँकेचे कर्मचारी आंदोलनात उतरू लागले असून त्याची सुरुवात मंगळवारी येथे झाली. या मागणीकडे लक्ष वेधत आज कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटा बदलाचा फटका राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. सरकारने घेतलेल्या नोटा बदलाच्या निर्णयामुळे बँकेच्या ग्राहक , खातेदार यांना पसे भरण्यासाठी व काढण्यासाठी त्रास होऊ लागला आहे. बँकांतील कर्मचाऱ्यात आणि नागरिकांत वाद झडत आहेत. ग्रामीण भागातील लोकांचे व्यवहार याच बँकेत असल्याने शेतकऱ्यांना दैनंदिन कामे करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने आज धरणे आंदोलन करत बँकेच्या व्यवहारावर होत असलेल्या परिणामाकडे शासनाचे लक्ष वेधले.  आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे, सचिव ए. बी. परुळेकर , भगवान पाटील, दिलीप लोखंडे, दामोदर गुरव, रमेश िलबेकर, रणजित परिट आदी शंभरावर कर्मचारी  सहभागी झाले होते. शेतकरी टिकला पाहिजे, गरीब टिकला पाहिजे, सहकार टिकला पाहिजे अशा घोषणा दिल्या जात होत्या.

संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अमित संनी यांना प्रधानमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर यांचा नावाचे निवेदन दिले. या वेळी बँकेच्या संचालिका, माजी खासदार निवेदिता माने, उदयिनी साळुंखे, कार्यकारी संचालक प्रतापसिंग चव्हाण उपस्थित होते. सनी यांच्याशी झालेल्या चच्रेवेळी दिघे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले . याबाबत स्टेट बँकेशी जिल्हा बँकेने चर्चा केली , पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. याप्रश्नी सत्वर मार्ग काढला नाही, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर सनी यांनी स्टेट बँके समवेत बठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.