03 December 2020

News Flash

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच; खडसेनंतर ‘हा’ नेता बांधणार हातावर घड्याळ

अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये नेत्यांचा प्रवेश होत आहे. भाजपाच्या एकनाथ खडसे यांच्यानंतर आता आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजीव आवळे मुंबईत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. आवळे हे कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत.

राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आवळे यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत. मात्र हातकणंगले मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची ही नांदी मानली जात आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 3:16 pm

Web Title: kolhapur hatkanangale ex mla rajiv awale to join ncp nck 90
Next Stories
1 नवे कृषी कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष कायम -पाटील
2 दिवाळीमुळे वस्त्रोद्योगाच्या आशा पल्लवित
3 भाजपला महाविकास आघाडीचे आव्हान
Just Now!
X