कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील संघर्षांचे आणखी एक दणकेबाज प्रकरण मंगळवारी पुढे आले. सफाई कर्मचारी कमी का पाठविले असा जाब विचारीत मनसे शहराध्यक्ष, अपक्ष नगरसेवक राजू आनंदराव िदडोल्रे यांनी महापालिकेचे आरोग्यनिरीक्षक जयवंत देवराव पोवार यांना शिवीगाळ करून धमकी दिली.  नगरसेवकाचे भाऊ विशाल िदडोल्रे व चालक बाजीराव िदडोल्रे यांनीही चोप दिला. हा प्रकार घडल्यानंतर कर्मचारी संघाने या घटनेचा निषेध करीत दुपारनंतर कामबंद आंदोलन केले.  याबाबत जयवंत पोवार यांनी पोलीस ठाण्यात तसेच आयुक्त कार्यालयात व महानगरपालिका कर्मचारी संघाकडे तक्रार केली.

कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांत  सातत्याने संघर्ष होत आहे. याची प्रचिती आज पुन्हा आली.  प्रभाग क्र. ७५ आपटेनगर येथील नगरसेवक राजू िदडोल्रे हे सकाळी मोटारीतून जात असताना रावजी मंगल कार्यालयासमोर त्यांना महापालिकेतील आरोग्यनिरीक्षक जयवंत पोवार दिसले. त्यांना बोलावून िदडोल्रे यांनी आमच्या प्रभागात सफाई कर्मचारी कमी का दिले, अशी विचारणा करीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच वादावादी करून अंगावर धावून गेले. स्वत:च्या संरक्षणात असलेली पिस्तूल दाखवून िदडोल्रे यांनी दम भरल्याचे पोवार यांचे म्हणणे आहे.

नगरसेवकाचे भाऊ विशाल िदडोल्रे व मोटारचालक बाजीराव िदडोल्रे यांनी मारहाण केली. शिवाय, तिघांनी प्रभागात कर्मचारी कमी दिल्यास नोकरीला मुकावे लागेल, अशी धमकी दिली.

याबाबत जयवंत पोवार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या तिघांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर ते महानगरपालिका कर्मचारी संघाच्या कार्यालयात येऊन या ठिकाणीही तक्रार दिली. कर्मचारी संघाच्या वतीने या प्रकाराबद्दल व िदडोल्रे बंधूच्या विरोधात आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे ही लेखी तक्रार दिली. महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून विठ्ठल रामजी चौकात येऊन निषेधाच्या घोषणा दिल्या.  कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्याची घोषणा कामगारांनी  केली. या वेळी कर्मचारी संघाच्या वतीने विजय वणकुद्रे, विजय चरापले, रमेश देसाई यांनी नगरसेवकांकडून वारंवार कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण, दमदाटी याबाबत निषेध व्यक्त केला.