कोल्हापूर जिल्ह्यात उच्च रक्तदाबचे सर्वाधिक ३ लाख, मधुमेहाचे सव्वा लाख तर हृदयरोगाचे १५ हजार रुग्ण आहेत. अतिजोखीम संख्या ७ हजार ८९० आणि मध्यम जोखीम १ लाख १७ हजार लोक आहेत. जिल्ह्यातील एक चतुर्थांश लोकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी पुढे आली आहे.

महाआयुष अंतर्गत ५० वर्षावरील ११ लाख ३२ हजार नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ५० वर्षांवरील नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या साडे ४१ लाख आहे. सर्व्हे केलेले नागरिक ११ लाख ३२ हजार (९८ टक्के), प्रत्यक्ष सर्व्हेक्षण ८ लाख २९ हजार (८१ टक्के), स्थलांतरित सव्वा लाख (१० टक्के) तर मयत ८२ हजार (७ टक्के) अशी आकडेवारी आहे.

करोना अत्यल्प

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ०.०३२ टक्के म्हणजेच १,३३१ रुग्ण करोनाने संसर्गित झाले आहेत. करोना रुग्णांचा आकडा हजाराच्या वर गेला असताना दुसरीकडे आजअखेर ८५९ जण बरे झाले आहेत. आज प्रत्यक्ष करोना पॉझिटिव्ह ४४० असून मृत्यू ३२ (अडीच टक्के) आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग त्रासदायक

सर्वेत आजाराची तपासणी केली आहे. त्यात मधुमेह, हृदयरोग त्रासदायक असल्याचे दिसले आहे. दमा १९ हजार ९७२ (२.१५ टक्के ), क्षयरोग १ हजार ५९ (०.११ टक्के), इतर फुफ्फुसांचे आजार १ हजार ४४० (०.१५ टक्के), मधुमेह १ लाख २३ हजार (१३.८१ टक्के), हृदयरोग १५ हजार ३८३ (१.६५ टक्के), मूत्रपिंडाचा आजार २ हजार ६१५ (०.२८ टक्के), कर्करोग १ हजार ९५४ (०.२१ टक्के), उच्च रक्तदाब ३ लाख १९ हजार (३४. ३१ टक्के) अशी आजारनिहाय आकडेवारी आहे.

‘कमी जोखीम’ दिलासादायक

इतर जुनाट आजार ३० हजार ४९५ (३. २८ टक्के). अतिजोखीम संख्या ७ हजार ६९० (०.८ टक्के), मध्यम जोखीम १ लाख १७ हजार (१२.६१ टक्के) कमी जोखमीची संख्या ८ लाख ४ हजार (८६. ५४) टक्के असल्याने हा एक दिलासा आहे.