News Flash

करोनाच्या संकटात कोल्हापूरकरांची वर्षाविहाराची मौजमजा; ओसंडून वाहणाऱ्या कळंबा तलावावर गर्दी

वर्षा विहाराचा आनंद घेताना लोकांना मास्क, फिजिकल डिस्टंसिंग याचा पडला होता विसर

कळंबा : जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शहराजवळचा कळंबा तलाव ओसंडून वाहत आहे. तलावाचे हे दृश्य पाहण्यासाठी बुधवारी कोल्हापूरकरांनी परिसरात मोठी गर्दी केली होती.

कोल्हापूर शहर आणि लगतच्या कळंबा गावात करोना रुग्णसंख्या वाढत असताना याचा कोल्हापूरकरांना जणू विसर पडला, असे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने कळंबा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात करोना महामारीचे संकट वाढत चालले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आठ हजाराहून अधिक झाली आहे. याचा मुकाबला करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रुग्णांची दवाखान्यात उपचार होत नाहीत, अशा तक्रारी आहे.

एकीकडे अशी गंभीर परिस्थिती शहरात निर्माण झालेली असताना दुसरीकडे नागरिकांनी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी कळंबा तलावावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी येथे पावसाळ्यात निसर्गप्रेमींची गर्दी होत असते. पण यंदा करोनाचं गहिरं संकट असतानाही त्याकडे नागरिकांनी डोळेझाक केल्याचे चित्र आहे. या गर्दीमध्ये वर्षा विहाराचा आनंद घेताना मास्क, फिजिकल डिस्टंसिंग याचा विसरही नागरिकांना पडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:34 am

Web Title: kolhapur residents enjoy the rainy season in the crisis of carona crowd to see overflowing kalamba lake aau 85
टॅग : Coronavirus,Monsoon,Rain
Next Stories
1 कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १० फुटांनी वाढ, पावसाचा जोर आणखी वाढला
2 कोल्हापूर : राम मंदिर भूमिपूजनानिमित्त करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिरही सजले
3 कोल्हापूर: राम मंदिर भूमिपूजनानिमित्त स्थानिक कार्यक्रमाला पोलिसांचा मज्जाव; हिंदुत्ववादी संघटनांमध्ये नाराजी
Just Now!
X