कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका बड्या राजकीय नेत्याला करोना व्हायरसची लागण झाली आहे. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ आता एका खासदारालाही करोनाची लागण झाली आहे. कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा करोना तपासणीचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक व त्यांच्या पत्नी आणि मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही बाधित झाल्यामुळे चिंता वाढली आहे.
यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे करोना उपचार घेत आहेत. तर, आमदार प्रकाश आवाडे यांनी करोनावर मात केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 10:53 am