कोल्हापुरात करोना रुग्ण वाढत असताना वैद्यकीय विभागातील अनागोंदी प्रखरपणे पुढे आली होती. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू छत्रपती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

डॉ. मिनाक्षी गजभिये यांची बदली करण्यात आल्याने आता त्यांच्याजागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेमणुकीस आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना अधिष्ठाता डॉ. गजभिये यांची जळगावला तडकाफडकी बदली झाल्याने सीपीआर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Mumbai, 150 Year Old, GT Hospital, Launch, Government Medical College, 150 years of gt hospital,
दीडशे वर्षांच्या जी. टी. रुग्णालयात आता वैद्यकीय महाविद्यालय!

यापूर्वी डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोल्हापुरात अधिष्ठाता म्हणून सेवा होती. या काळात त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले होते. काही कारणास्तव त्यांची धुळ्याला तडकाफडकी बदली होऊन डॉ. अजित लोकरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, डॉ. मिनाक्षी गजभिये या सहा महिन्यांपासून येथे नियुक्त होत्या. शुक्रवारी अचानक त्यांची बदली करून त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नेमणूक करण्यात आली.

करोनाच्या रुग्णसंख्येबाबत अनागोंदी कारभार

जिल्ह्यात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना अधिष्ठाता गजभिये व जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील यांच्यातील ‘ऑफिस-ऑफिस’ वाद रंगात आला होता. दोघांत समन्वय नव्हता. अधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद चर्चेत होते. करोना रुग्णस्थिती, संख्या याची माहिती देण्यात कमालीचा अनागोंदी कारभार कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत होता. त्यातून एकदा तर गजभिये यांनी माहिती देणारा व्हाट्सअॅप ग्रुपच बंद करण्याचा इशारा दिल्याने माध्यमकर्मीही चक्रावले होते. या साऱ्या वादाची परिणीती म्हणूनच गजभिये यांची बदली झाल्याची वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून त्यांची बदली झाली आहे.