04 July 2020

News Flash

कोल्हापुरात करोना रुग्ण संख्येने  सहाशेचा आकडा ओलांडला

काल रात्री उशिरा एका करोना बाधित महिलेचा मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर करोना सकारात्मक असलेला रुग्ण आढळला नव्हता. मात्र सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या सहाशेच्या पलीकडे पोचली असून जिल्ह्यात ६१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल रात्री उशिरा एका करोना बाधित महिलेचा मृत्यू झाला.

आज सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. हा दिलासा वाटत असताना सायंकाळी चाचणी अहवाल सूत्रांनी जाहीर केला. त्यानुसार शाहूवाडी तालुक्यातील दोन, करवीर व आजरा येथील प्रत्येकी एक तर शहरातील दोघांचा समावेश आहे. त्यात चार महिला, दोन पुरुष व एका शालेय मुलीचा समावेश आहे.

मृत्यूचा आकडा सहावर

रविवारी रात्री लाळगेवाडी या शाहूवाडी तालुक्यातील गावातील एका ५५ वर्षीय करोना बाधित महिलेचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६ झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाने सतर्क होऊन उपाययोजना सुरु केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्यातील लोकांना करोना चाचणी करून प्रवेश दिला जात आहे. आज सुमारे दीड हजार लोकांची चाचणी झाली. त्यातून काही करोना  रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यामध्ये करोनामुक्त होणारे रुग्ण संख्याही वाढत आहे. एकूण १३४ लोक करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 4:08 am

Web Title: kolhapur the number of corona patients crossed the six hundred abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूर : कामगार विमा योजनेच्या अलगीकरण कक्षाचे लोकार्पण
2 कोल्हापुरात करोनाबाधित रुग्णांची संख्या सहाशे पार
3 कोल्हापूर : जूनच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शेतकरी सुखावला
Just Now!
X