News Flash

कोल्हापुरात दुकाने बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर

करोना टाळेबंदीच्या नियमावलीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत.

कोल्हापुरात व्यापारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून असे आंदोलन केले.( छाया — राज मकानदार)

कोल्हापूर : सर्वच प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. दुकान, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे फलक हातात घेऊन व्यापाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

करोना टाळेबंदीच्या नियमावलीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. अन्य व्यवसाय, व्यापार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.    याबाबत चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत शहरातील सर्व व्यापा?ऱ्यांनी बुधवारी दुकाने दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद केली होती. व्यापारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून दुकानदारांना न्याय द्या करोना जायचा तेव्हा जाईल पण त्याआधी व्यापारी मातीत जाईल, सर्व प्रकारचे कर माफ करा या मागणीचे फलक हाती घेऊन आंदोलन केले. शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, महाद्वार रोड, शिवाजी चौक अशा मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आंदोलनात उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. दुकाने बंद झाल्याने शहरातील वर्दळही कमी झाली होती. तर आपापल्या दुकानांसमोर रांगेत उभ्या असलेल्या व्यापाऱ्यांची ओळीने झालेली गर्दी नजरेत भरणारी होती.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:55 am

Web Title: kolhapur traders protest on road against lockdown zws 70
Next Stories
1 ‘पीपीई किट’ निर्मितीला चालना; मात्र स्थानिक उद्योजक वंचित
2 गोकुळ दूध वृद्धीसाठी ५०० कोटींचे वित्तसाहाय्य
3 पीपीई किटनिर्मितीला चालना; मात्र स्थानिक उद्योजक वंचित
Just Now!
X