कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गातून कोकण-घाटमाथा संबंधांना झळाळी

मनमाड-इंदूर, कोल्हापूर-वैभवाडी, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या राज्यातील वर्षांनुवर्षे रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील रखडलेले ९१ सिंचन प्रकल्प पुढील मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची घोषणा अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यापाठोपाठ मनमाड-इंदूर हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. कोल्हापूर आणि वैभववाडी हा कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची योजना आहे. निधीबरोबरच भूसंपादन हा रेल्वे मार्गातील मुख्य अडथळा आहे. हे सारे अडथळे कसे पार पाडले जातील, यावरच सारे अवलंबून आहे. मराठवाडा, खान्देशातील विकासाला रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर चालना मिळू शकेल.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असल्याने कोकण – घाटमाथा संबंधांना नवी झळाळी मिळणार आहे . प्रवाशी आणि मालवाहतुकीला नवा फायदेशीर पर्याय पुढे येणार आहे . मात्र, विकासाचा नवा सेतू नवे  आकाराला येत असताना नव्या  पर्वाची  नवी आव्हाने उभी राहणार  असून तीवर मात  करून पुढे सरकने सह्याद्री सर करण्याइतके कठीण काम आहे . सुमारे साडे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीतील निम्मा वाटा  राज्यशासनाला उचलावा लागणार असून याबाबतीत आर्थिक पातळीवर झुंजणाऱ्या महाराष्ट्रावर मोठी भिस्त असणार आहे . विकासाच्या प्रत्येक बाबीला नन्नाचा  पाढा म्हणणाऱ्या कोल्हापूरकरांची बागायती  भूमिसंपादनातील मानसिकता खूपच महत्वाची ठरणार आहे .

कोल्हापूर – कोकणचे संबंध पुराणकाळापासून. आता  हे संबंध लोहमार्गाने जोडले जाणार आहेत, त्याला निमित्त ठरणार आहे ते म्हणजे  कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेली मंजुरी. गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग आकाराला यावा यासाठी प्रय सुरु होते. २० -२५ वर्षांपूर्वी पंचवार्षिक योजना आयोगाने  हि मूळ संकल्पना मांडली. तिला फारशी गती मिळाली नाही. कोकण रेल्वेच्या पनवेल – मेंगलोर मार्गावर अपघात झाला कि पर्याय म्हणून गोवा किंवा बेळगाव- मिरज मार्गे प्रवाशांना न्यावे लागते. वरचेवर असे अपघात होत असल्याने एक नवा पर्याय म्हणून रेल्वे प्रशासन कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाकडे पाहते , असे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मोहन शेटे यांचे म्हणणे आहे.  रेल्वे मंत्री पदाची धुरा कोकणपुत्र सुरेश प्रभू यांच्या खांद्यावर आल्यावर त्यांनी हा प्रकल्प मनावर घेतला. आणि आता  कोकण रेल्वे मार्गावरच्या वैभववाडी ते कोल्हापूर अशी रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी केली.  कोकणी माणसांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारी कोकण रेल्वे लवकरच पष्टिद्धr(१५५)म महाराष्ट्रात दाखल होत असल्याने घाटमाथा  – कोकण यांच्या विकासाचे नवे पर्व आकाराला येईल. मात्र हे साकारणे आव्हानास्पद आहे.

पष्टिद्धr(१५५)म महाराष्ट्रात  विकासाची गंगा आधीपासूनच प्रवाहित आहे. आता कोकणातही औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. मोठमोठे प्रकल्प कोकणच्या भूमीत अंकुरत  आहेत.   रत्नगिरी जिल्’ात वैभववाडीजवळ इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी ४०  अब्ज डॉलरचा निधी लागणे अपेक्षित आहे.  हा प्रकल्प २०२२  पर्यंत तयार होऊ  शकतो.  या प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख मेट्रिक टन तेल शुध्दीकरण होणार आहे . कोकणातील लाखो बेरोजगारांच्या हाताला काम  मिळणार आहे. यादृष्टीने या रेल्वे मार्गाचे विशेष महत्व आहे. कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडल्याने व्यापार, उद्य्ोग व पर्यटनात सुधारणा होणार आहेत. कोल्हापुरातून कोकणमार्गे शेतमाल, गूळ, साखरेची मोठी निर्यात होते. हा रेल्वेमार्ग साकारल्याने हा माल अगदी सुलभरीत्या , कमी खर्चात कोकणात पोहोचणार आहे. कोकणातील तेल, खनिज पदार्थ कोल्हापूरसह पष्टिद्धr(१५५)म महाराष्ट्रात यापुढे रस्तामार्गाबरोबरीने रेल्वेने पोहचणार आहे .कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडल्याने विशाखापट्टणमपासून बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रापर्यंत रेल्वेचे जाळे अल्प खर्चात उभे करता येणे शक्य आहे.

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्ग साकारताना भूमी संपादन हा महत्वाचा भाग आहे. त्याला जोडूनच कोल्हापूरकरांची  मानसिकताही उल्लेखनीय ठरणार आहे. विकास हवा म्हणून टाहो फोडायचा आणि प्रकल्प हाती येतो म्हटले की ओरड सुरु करायची असे करवीरनगरीत घडत आहे . ४५० कोटी खर्चाच्या कोल्हापूर शहर अंतर्गत रस्ते प्रकल्प आयआरबी कंपनीने पूर्ण केल्यावर कडव्या विरोधाचा अनुभव अलीकडेच आला आहे . कराड- चिकोडी रेल्वे मार्गाच्या भूमिसंपादनात हातकणंगले तालुक्यात हल्लीच आंदोलन उभे राहिले आहे. कोल्हापूर विकास प्राधिकरणाची बैठक ग्रामीण जनतेने उधळून लावली. हा अनुभव जमेला धरला आणखी एक  कृती समितीचा जन्म होऊन या रेल्वेमार्गाला खो घातला जाण्याची भीती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मोहन शेटे यांनी व्यक्त केली. हा मार्ग होण्याबाबत दोन सर्वे झाले आहेत. एक मार्ग शिवाजी विद्यपीठ- पाचगाव  येथून जाणारा तर दुसरा कसबा  बावडा मार्गाचा आहे. दोन्ही मार्ग सुपीक जमिनीतून पुढे जाणारे असल्याने बागायतदार शेतकरम्य़ांच्या हितासाठी कोणीही डोके वर काढू शकते. या अडचणींचा विचार आताच रेल्वे प्रशासनाने करणे रेल्वे प्रकल्प  साकारण्यास उपयुक्त ठरणार आहे .