“शेजारच्या सातारा जिल्ह्याला केंद्र शासनाचा पुरस्कार मिळतो आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कारभाराच्या चौकशीचा आदेश मला काढावा लागतो ही दुर्दैवी गोष्ट आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत खरेदी करण्याचा सपाटा लावलेला कारभार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. येथे सुरू असलेले ‘रस्सा मंडळ’ बंद करून टाका”, अशा खरमरीत शब्दांमध्ये ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांशी शुक्रवारी खरडपट्टी काढली. सत्तारूढ गटाचे नेते मंत्री मुश्रीफ यांनीच घरचा आहेर दिल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य चांगलेच बुचकळ्यात पडले.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादग्रस्त झाल्याने तिची शोभा झाली. जिल्हा परिषदेची सभा दर महिन्याला एकदा घ्यावी. तीन महिन्यातून एकदा सहभाग घेतले पाहिजे असे कुठे नियम नाही. मासिक सभा घेतली की सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांमुळे किमान ५० लोकांना बसण्याची परवानगी मिळेल. ही संधी कोणाला द्यायची ते चिठ्ठी टाकून ठरवता येईल. परंतु, कोल्हापूर जिल्हा परिषदेत विकास कामे झाली पाहिजेत. निधी परत जातो आणि चौकशी लागते हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्य जनता करोना विषाणूच्या महामारीचा मुकाबला करताना तुम्ही ‘रस्सा झोडता’ हे लोकांना अजिबात रुचणारे नाही. असे प्रकार बंद करा. तुमच्या जेवणाची सोय करायची असेल तर ती मी शासकीय विश्रामगृहात करतो, असा टोला मुश्रीफांनी लगावल्यावर सदस्यांचे चेहरे पाहण्या लायक झाले होते.

Hasan Mushriff on shahu maharaj
“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा
social welfare officer sunil khamitkar suspend
सोलापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी खमितकर निलंबित 

कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सत्तारूढ गटाचा सुरु असलेल्या कारभारावर कोरडे ओढले.