News Flash

कोल्हापूर : झेडपी अध्यक्षांनी विरोधी सदस्याचा ‘बाप’ काढल्याने खडाजंगी

आमदार आवाडे यांच्यावरील शेरेबाजीने विरोधक आक्रमक

कोल्हापूर : झेडपी अध्यक्षांनी विरोधी सदस्याचा ‘बाप’ काढल्याने खडाजंगी झाली. आमदार आवाडे यांच्यावरील शेरेबाजीने विरोधक आक्रमक.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी विरोधी सदस्य राहुल आवाडे यांना त्याचे वडील आमदार प्रकाश आवाडे यांना उद्देशून टोमणा मारला. या प्रकारामुळे आवाडे यांच्यासह विरोधकांनी पाटील यांच्यावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शरसंधान साधले. यातून पाटील–आवाडे यांच्यात जोरदार खडाजंगी रंगली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेची सभा सभागृहात घ्यायची की समाज माध्यमाद्वारे यावरून सत्तारूढ व विरोधकात वाद रंगला होता. अखेर निवडक सदस्य सभागृहात आणि उर्वरित समाज माध्यमातून सभेत सहभागी होतील असा निर्णय झाला. पण समाज माध्यमाद्वारे सभेत सहभागी झालेले सदस्य सभेचा व्हिडिओ आणि आवाज खराब येत असल्याने संतप्त झाले होते.

‘या’ असंसदीय शब्दप्रयोगाने पडली वादाची ठिणगी

ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेने परत पाठवल्याने त्याविषयी भाजपा समर्थक आवाडे यांनी विचारणा केली असता त्यावर अध्यक्ष पाटील यांनी ‘तुझ्या पप्पाला या निर्णयाबाबत विचार’, असे असंसदीय उत्तर दिल्याने वादाला तोंड फुटले. आमदार आवाडे यांना उद्देशून टोमणा मारल्याने राहुल आवाडे यांच्यासह विरोधकांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. सभागृहात एकाच गोंधळ सुरु झाला. अखेर पाटील यांनी उच्चारलेले शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे त्यांनी मान्य केल्यावर वादावर पडदा पडला. नंतरही अनेक विषयावरून सत्तारूढ–विरोधकांमध्ये शब्दीक वाद झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 8:14 pm

Web Title: kolhapur zp president passed comment on father of opposition members aawade aau 85
Next Stories
1 कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण, पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
2 कोल्हापुरात पावसाचा वेग वाढला; राजाराम, शिंगणापूर बंधारे वाहतुकीसाठी बंद
3 राज्यातील आघाडी सरकारने जनतेला साडेसात हजार रुपये द्यावेत; भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा
Just Now!
X