सुसाट वेगाच्या गो काटिर्ंग रेसिंगच्या थरारक क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण केलेल्या कोल्हापूरचा कृष्णराज महाडिक आता आंतरराष्ट्रीय फॉम्र्युला प्रकारातील स्पर्धा गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. याकरिता इंग्लंडच्या ख्रिस डिटमन रेसिंग टीमशी कृष्णराज करारबध्द झाला आहे.
कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या खेळाडूंनी नेमबाजी, जलतरण, कुस्ती आदी क्षेत्रात लौकिक निर्माण केला आहे. येथील खेळाडूंनी रेसिंगमध्येही दबदबा निर्माण केला आहे. गो काटिर्ंग रेसिंग हा प्रकार म्हणजे वाहनचालकाचा कस पाहणारा, कौशल्य पणाला लावणारा थरारक क्रीडा प्रकार आहे. आत्यंतिक वेगाने धावणारी वाहने, प्रतिस्पध्र्याला मागे टाकण्यासाठी सेकंदागणिक चाललेली चढाओढ आणि विजयाचे क्षणोक्षणी बदलाणारे रंग अशा रोमांचक वातावरणात पडणाऱ्या गो काटिर्ंग रेसिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा पावली आहे. कोल्हापूरच्या कृष्णराजने गेल्या आठ वर्षांत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्याची कामगिरी उंचावत चालली आहे. बुध्दा इंटरनॅशनल सíकटवर झालेल्या बी. एम. डब्ल्यू. एफ. टी. ओ. टू आणि एलजीबी फॉम्र्युला फोर या दोन वेगवेगळया स्पध्रेतील अंतिम फेरीतील एकूण सहा शर्यतींमध्ये कृष्णराजने पाच ओडीएम पोझिशन पडकावले होते. या प्रकारातील चॅम्पियनशिपमध्ये त्याने तिसरे स्थान पटकावले.
कृष्णराजच्या या धवल कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेसिंग वर्तुळात घेतली गेली आहे. इंग्लंडमधील प्रसिध्द ख्रिस डिटमन रेसिंग स्कूलचे प्रमुख ख्रिस डिटमन यांनी कृष्णराजला रेसर म्हणून करारबध्द केले आहे. ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर्स क्लबमध्ये कृष्णराजचा समावेश झाला असून आता तो आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. १७ देशांची समावेश असलेली ही स्पर्धा इंग्लंड व बेल्जियम येथील रेस ट्रॅकवर होणार आहे.
या स्पध्रेसाठी आपण कसून सराव करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत स्पध्रेत कमी पडणार नाही असा विश्वास कृष्णराजने व्यक्त केला. कोल्हापूरचा खेळाडू जागतिक पातळीवरील प्रसिध्द रेसिंग टीमशी करारबध्द होत असल्याचा आनंद त्याचे पिता खासदार धनंजय महाडिक व आई अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला. कृष्णराजला सचिन मंडोडी प्रशिक्षण देत असून तो येथील मोहीतेज रेसिंग अॅकॅडमीचा सदस्य आहे.