04 August 2020

News Flash

चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलची आघाडी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलने आघाडी घेतली आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या प्रक्रियेला प्रत्यक्ष मतमोजणी होऊन पहिला निकाल हाती येण्यास रात्र उजाडली. समर्थ पॅनेलच्या अभिनेत्री वर्षा उसगावकर, रंगभूषा गटातून चैताली डोंगरे, ध्वनिरेखन गटातून शरद चव्हाण, कामगार गटातून रणजित जाधव यांनी बाजी मारली. रात्री उशिरापर्यंत इतर ९ विभागांची मतमोजणी सुरू होती.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्हीही केंद्रांची एकत्रित मोजणी कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये झाली. दुपारच्या भोजनाची सुट्टी होताच मतमोजणी हाती घेण्यात आली. यामध्ये सुरुवातीला स्थिर चित्रण, संकलन, रंगभूषा, ध्वनिरेखन आणि अभिनेत्री या पाच विभागांची मतमोजणी हाती घेण्यात आली. या पाच विभागात मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेलने आघाडी घेतली होती. रात्री उशिरापर्यंत इतर ९ विभागांची मतमोजणी सुरू होती. मतमोजणीच्या सुरुवातीलाच सर्वच पॅनेलनी आपल्या विजयाचा दावा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2016 3:35 am

Web Title: lead of samarth panel in film corporation election in kolhapur
टॅग Kolhapur,Lead
Next Stories
1 चित्रपट महामंडळ मतमोजणी संथगतीने
2 गणेश कुलकर्णी खून खटल्यातील सर्व आरोपींची मुक्तता
3 पाउस मोप हुईल, रब्बीचा पेरा चांगला साधेल; मिरजेच्या ब्रह्मनाथ यात्रेतील भाकणूक
Just Now!
X