07 July 2020

News Flash

महाजनादेश यात्रेचे गणित जमवताना मुख्यमंत्र्यांची कसरत, एकाच दिवसात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण दौरा

सोमवारी सातारा, सांगली, कोल्हापूर असे तीन जिल्ह्यातील कार्यक्रम आवरून ते कोल्हापुरात मुक्काम करणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेला उपस्थिती लावताना दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण असा प्रादेशिक मेळ घालावा लागणार आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्ह्यतील यात्रेची जय्यत तयारी झाली असली, तरी शासकीय आणि पक्षाच्या कार्यक्रमाचे वेळेचे गणित जमवताना मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागणार असल्याचे संयोजकांनी रविवारी येथे दिलेल्या माहितीवरून दिसून आले.

सोमवारी सातारा, सांगली, कोल्हापूर असे तीन जिल्ह्यातील कार्यक्रम आवरून ते कोल्हापुरात मुक्काम करणार आहेत. कोल्हापुरातून पहाटे पाच वाजता मोटारीने बेळगाव गाठून औरंगाबाद येथील हैदराबाद मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला अभिवादन व ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती लावून पुन्हा विमानाने कोल्हापूर जिल्ह्यत यात्रेच्या कार्यR मात सहभागी होऊन कोकणात सिंधुदुर्गला रवाना होणार आहेत.

महाजनादेश यात्रा दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात असून या यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौरा आणि कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांची सोमवारी सातारा जिल्ह्यातील कराड येथे सकाळी १० वाजता पत्रकार परिषद आहे. त्यानंतर ते सांगली जिल्ह्यत कासेगाव, इस्लामपूर, ताकारी, पलूस (जाहीर सभा), तासगाव, मिरज, सांगली असा सांगली जिल्ह्यचा दौरा करणार आहेत. दुपारी चार वाजता ते कोल्हापूर जिल्ह्यतील जयसिंगपूर, इचलकरंजी (जाहीर सभा), कोल्हापुरात रात्री ८ वाजता ताराराणी चौकात जनसमुदायास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असणार आहे. औरंगाबाद येथील कार्यक्कमाला उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी पहाटे ते कोल्हापुरातून बेळगावला जाणार आहेत. तेथून विमानाने औरंगाबादला पोहोचतील आणि पुन्हा विमानाने कोल्हापूरला येऊ न यात्रेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मंडलिकांनी निर्णय घ्यावा – महाडिक

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज हे भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात उभे राहणार असून लोकसभा निवडणुकीला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे त्यांना मदत करणार आहे. या घटनेबाबत बोलताना मंडलिक यांचे लोकसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि भाजपात प्रवेश केलेले धनंजय महाडिक यांनी ‘काँग्रेसच्या मंचावर शिवसेनेच्या खासदारांनी जाणे हेच वेगळे आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. शिवसेनाही याबाबत योग्य तो निर्णय घेईल,’ असे सांगितले. आपण आता भाजपात प्रवेश केला असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात महाडिक गटाचे शक्तिप्रदर्शन असे काही नसेल. यापुढे जे काही असेल ते भाजप म्हणून असेल, असे स्पष्ट करीत त्यांनी भाजपमधील सक्रियता स्पष्ट केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:01 am

Web Title: mahajandesh yatra west maharashtra marathwada konkan tour in one day abn 97
Next Stories
1 पोलंड-कोल्हापूरकरांच्या ऋणानुबंधांना पुन्हा उजाळा!
2 पोलंडच्या ‘त्या’ निर्वासितांकडून कोल्हापूरच्या भूमीला वंदन
3 पूरग्रस्त कोल्हापुरात ‘स्पिकरच्या भिंतीं’ना विराम
Just Now!
X