पहिला टप्पा ७२ कोटींचा

नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून महालक्ष्मी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला जिल्हा पर्यटन समितीच्या बठकीत मंजुरी देण्यात आली. एक ऑक्टोबरपासून विकासकामांना सुरुवात करण्यात येणार असून मेपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम संपविण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

जिल्हा पर्यटन समितीची बठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  झाली, त्या वेळी ते बोलत होते. बठकीस खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते.

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरकरांसाठी श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा असून या कामी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असेही  पाटील यांनी सांगितले. यामध्ये भाविकांची सोय, पाìकग आणि भक्त निवास, दर्शन मंडप याबाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्णाात पर्यटनाला मोठा वाव असून येत्या ऑक्टोबरमध्ये कोल्हापूर महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या वेबसाईटचा शुभारंभ, तसेच जिल्ह्णाातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या रेट्रो रिफ्लेक्टिव बोर्डचे अनावरणही पालकमंत्री  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्णाात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर हे फलक बसविण्यात येणार आहेत.

महालक्ष्मी मंदिर संरक्षित स्मारक

महालक्ष्मी मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्राथमिक अधिसूचना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून जारी करण्यात आली. या अधिसूचनेमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुधारणांच्या नावाखाली मंदिराची होत असलेली हेळसांड थांबणार आहे. दोन महिन्यांनंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. ही अधिसूचना २० जुलला प्रकाशित करण्यात आली असून ती मंदिरात लावण्यात आली. या अधिसूचनेनुसार महत्त्वाचे मुद्दे याप्रमाणे –  महालक्ष्मी मंदिर राज्य संरक्षित स्मारक ,वर्षभरात २५ लाख भाविक भेट,  दोन हजार वर्षांपूर्वीचे मंदिर असल्याची नोंद,  महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपकी प्रमुख देवता, हेमाडपंती स्थापत्याचा उत्तम नमुना, मंदिराचे क्षेत्रफळ ७०५४ चौरस मीटर.