नवरात्रोत्सवाच्या काळात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनाची नामी संधी उपलब्ध करून दिली असून, देशभर व परदेशात इंटरनेटच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. त्यामुळे देवीचे दर्शन आणि महाआरतीचा लाभ जगभरातील भाविकांना इंटरनेट माध्यमातून घेता येणार आहे.
देवीच्या दर्शनासाठी आसुरलेल्या डोळ्यांना तृप्त करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून चालू घडामोडीचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. अंबाबाईची महाआरती, कापूर आरती, धूपारती आणि रात्री केली जाणारी शेजारती आता इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोचणार आहे.
देवस्थान समिती वेबसाइट सतत रोजच्या रोज कार्यक्रम दिसत आहे. कोल्हापूर अंबाबाई ऑडिओ इतके शब्द ध्वनिफीत ऐकण्यास पुरेसे आहेत. या ध्वनिफीत आणि चित्रफीत पाहण्यासाठी संकेतस्थळ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. इंटरनेटवर ध्वनिफीत ऐकवली जाणार आहे. त्यानंतर काही कालावधीमध्येच चित्रफिती दाखवण्यासाठी संच करण्यात येणार आहे. आरती, मंत्रोच्चार आणि चित्रफीत सेवा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा केवळ नवरात्रोत्सवापुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याचे देवस्थान समिती प्रशासनाने सांगितले. गेले दोन ते तीन वर्षांत देवस्थान व्यवस्थापन समिती भाविकांच्या  सोयीसाठी वैविध्यपूर्ण बदल करताना दिसत आहे. या निमित्ताने व्यवस्थापन कार्पोरेट लिंक ही जगासमोर येणार आहे. थोडय़ाच दिवसांमध्ये पूजेसाठी ऑनलाइन बुकिंगची ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात