News Flash

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना पाच लाखांची मदत

राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचा निर्णय

कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेले भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे चांगले उपचार व्हावेत, या करिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून त्यांना पाच लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर खंचनाळे यांच्या रूग्णालयातील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता राज्य शासनाकडून त्यांना मदत करण्यात आली.

पहिले हिंदकेसरी खंचनाळे यांच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विविध व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे वारंवार त्यांची प्रकृती चिंताजनक होत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, याकरता राज्य शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपचाराकरिता क्रीडा व युवा सेवा संचालनालयातर्फे राज्य क्रीडा विकास निधीतून पाच लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 7:23 pm

Web Title: maharashtra hind kesari sripathi khanchanale given 5 lakh cheque for treatment in hospital vjb 91
Next Stories
1 प्रचाराची घसरती पातळी..
2 “उद्या उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘उठा’ व्हायला लागला तर…”
3 …तर मनसेलाही सोबत घेऊ- चंद्रकांत पाटील
Just Now!
X