कोल्हापूर

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. एक चेहरा दिसायला मृदू, लोकांना मदत करणारा तर दुसरा मिळालेल्या सत्ता व संपत्तीचा वापर करून विरोधकांना जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न करणारा”, असा घणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केला. गेले काही दिवस कोल्हापुरात आमदार पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. करोना संकट काळात केलेल्या मुद्दावरून आज मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“करोनासदृश्य संकटकाळामध्ये पाटील यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली आणि मदत दिली नाही असंही वक्तव्य मी केलेलं नाही. उलट गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन-तीन लाख नागरिकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल याची खात्री आहे. मी व माझ्या फौऊंडेशनने केलेली मदत जर जाहीर करण्यात आली, तर आपण पुन्हा ईडी, इन्कम टॅक्स विभाग माझ्या मागे लावाल. म्हणून मी मदत जाहीर करत नाही”, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.

“मी आमदार पाटील यांचा वैचारिक विरोधक होतो. मला संपवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कारवाई सुरु करण्यात आली. मी सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून कायदा केला. राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक म्हणून अजित पवार, कै. पांडुरंग फुंडकर, आनंदराव अडसूळ, जयंत पाटील यांनी भेट घेतली असता तुम्ही ‘मी चौकशी लावली आहे, त्यामध्ये मला हसन मुश्रीफ यांना अडकवायचे आहे’, असे उत्तर दिले. पंधरा वर्षे मंत्री असताना मी शिपायाचीसुद्धा बदली केली नाही. कोणाला त्रास देणे तर सोडाच. पण माझ्याबाबतीत मात्र ईडी, इन्कम टॅक्स सत्र सुरू राहिले”, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.