‘अमर रहे.. अमर रहे, हुतात्मा जवान प्रवीण येलकर अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे मातरम्’ अशा आसमंत दणाणून टाकणाऱ्या घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत हुतात्मा लष्करी अधिकारी मेजर प्रवीण येलकर यांना आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावात शासकीय व लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. श्री भरवनाथ हायस्कूलच्या मदानावर येलकर यांच्या पार्थिवास त्यांचे बंधू राजेंद्र यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पत्नी पुनम येलकर, चार वर्षांची मुलगी प्रांजल, वडील तानाजी येलकर, आई शालन येलकर यांच्यासह उपस्थितांना शोक अनावर झाला होता.

कारगील परिसरात लष्करी वाहनावर दरड कोसळून झालेल्या अपघातात मेजर प्रवीण येलकर हे नुकतेच हुतात्मा झाले. त्यांचे पाíथव आज सकाळी बहिरेवाडी येथे आणण्यात आले. बहिरेवाडी गावातून हुतात्मा येलकर यांच्या पाíथवाची फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पाíथवावर पुष्पवृष्टी केली. गावातील प्रत्येक चौकात प्रवीण येलकर अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम.. अशा घोषणांचे फलक लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा महिला, आबालवृध्द, तरूण मुले, मुली, शाळेची मुले, हुतात्मा  ‘प्रवीण येलकर अमर रहे’ च्या घोषणा देत होते. यावेळी लष्करी व पोलीस दलातील जवानांनी हुतात्मा येलकर यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाचा शोक अनावर झाला.

AAP's Latest Protest Against Arvind Kejriwal Arrest
केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ उपोषण
Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

जिल्हा प्रशासनाच्यावतीने येलकर यांच्या पार्थिवास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. येलकर यांचे वडील तानाजी येलकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपल्या कुटुंबाला मदत करण्यात येईल असे सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक संजय मोहिते, आमदार हसन मुश्रीफ, कर्नल कावेरीअप्पा, भुदरगड- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सुभाष सासने, उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील, हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.