24 January 2020

News Flash

गावठी बंदुका विकणारा अटकेत

वन प्राण्याच्या शिकारीसाठी या बंदुका बनवून विक्री केल्याच्या संशय आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

कोल्हापूर : लेथ मशीनचा वापर करून गावठी बनावटीच्या बारा बोअर बंदुका तयार करून विक्री करणाऱ्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या घरावर छापा टाकून ५ लाख रुपये किमतीच्या ९ रायफली जप्त केल्या. या प्रकरणी गोविंद महादेव सुतार (वय ३५) याला अटक केली आहे. वन प्राण्याच्या शिकारीसाठी या बंदुका बनवून विक्री केल्याच्या संशय आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुR वारी पत्रकार परिषदेत दिली.

भुदरगड तालुक्यातील गावठी बनावटीच्या बंदुका तयार करणारा एक व्यक्ती मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बंदूक विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस पोलिसांना यांना खबऱ्यामार्फत समजली होती.

त्यानुसार पोलिसांनी  सापळा लावला होता. गुरुवारी सायंकाळी परिख पुलाकडे जाणाऱ्या रोडवर एक तरुण गोणपाट घेऊन निघाला होता. त्याची झडती घेतल्यानंतर पोत्यात १२ बोअरची गावठी बनावटीची बंदूक सापडली.

आपण स्वत: गावठी बनावटीची हत्यारे तयार करून विक्री करतो असे त्याने पोलिसांना सांगितले.

First Published on August 9, 2019 3:34 am

Web Title: man arrested for selling desi pistol zws 70
Next Stories
1 महानगरांचा दूध, भाजीपाला पुरवठा ठप्प
2 पुणे-बेंगळुरू महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद
3 कोल्हापुरात महापुराची तीव्रता वाढली; मदतकार्याला जोर
Just Now!
X