सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यव्यापी मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाने आता राजकीय पक्ष बांधणीची मोर्चेबांधणी केली आहे. या राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय बुधवारी कोल्हापूर येथे घेण्यात आला. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात येणार येणार असल्याची घोषणा आज मेळाव्यात करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर समाजबांधवांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न समाजाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी बुधवारपासून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमधून या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीला सर्वत्र जोर चढला आहे. त्यातून मराठा समाजाकडून सातत्याने विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. अद्याप मराठा समाजाला प्रत्यक्षात आरक्षण मिळालेले नाही, याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू आहे.

त्याला गती मिळावी यासाठी राजकीय पक्ष स्थापन करून गती आणि लढा देण्यासाठी हा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदीर सभागृहात आज मेळावा पार पडला. त्यामध्ये चर्चेअंती मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाले. दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. त्याचवेळी पक्षाची ध्येयधोरणे, राजकीय दिशा स्पष्ट केली जाणार आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.