इचलकरंजी येथे विकली मार्केट परिसरमध्ये रविवारी परम गोल्ड या सराफी दुकानाचे मालक अनिल शिंदे (रा.पंत मळा, खानाज गल्ली, मूळ गाव दत्तवाड) ह्याचा भरदिवसा दुकानात घुसून अज्ञातांनी खून केला. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

विकली मार्केट परिसरात अनिल शिंदे यांचे परम गोल्ड नावाचे सराफी दुकान आहे. ते आज दुपारी जेवून दुकानात आले. काही वेळाने काही अज्ञातांनी त्यांच्या दुकानात घुसून धारधार शस्त्राने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी तिजोरीतील दागिने व काही मुद्देमाल चोरून नेला.

पी. व्ही. पालनकर ज्वेलर्सचे दोन कामगार आपले सोने रिफाईन करण्यासाठी शिंदे यांच्याकडे गेले होते. ते शिंदे यांच्या केबिनमध्ये गेले असता ते रक्ताच्या सड्यामध्ये खुनी अवस्थेत पडलेले दिसले. हे पाहताच त्या दोघांनी शेजारील दुकानदारांना याची कल्पना दिली.

त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन या घटनेचा पंचनामा केला. अनिल शिंदे हे गोल्ड टेिस्टग मध्ये सर्वात मोठे व्यापारी होते. त्याचबरोबर मोठ-मोठ्या ज्वेलर्सचे सोने-चांदी व रिफाईनचे काम करत असत.