नाम फाउंडेशन नाना किंवा मकरंदची खासगी मालमत्ता नसून, फाउंडेशन चालवणारी पिढी आपल्याला उभी करायची आहे. तरी, या फाउंडेशनच्या कामासाठी युवकांनी पुढे यावे, गाव पुढे नेण्यासाठी एकोपा महत्त्वाचा असल्याने एकदिलाने काम करावे, असे आवाहन नाम फाउंडेशनचे प्रवर्तक व अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. गाव एक कुटुंब म्हणून वावरायला लागले, की गावाला महत्त्व येते, विकासाला गती येते. एकजूट साधा; नाम फाउंडेशन आपल्या पाठीशी भक्कम उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
नाम फाउंडेशनच्या वतीने दुष्काळी नलवडेवाडी (ता. कोरेगाव) येथे जलशुध्दीकरण यंत्रणेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, ग्रामपंचायत कचेरी व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे उद्घाटनही करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. नाम फाउंडेशनचे विश्वस्त अभिनेते मकरंद अनासपुरे, फाउंडेशनचे विश्वस्त राजीव सावंत, डॉ. अविनाश पोळ, जिल्हाधिकारी आश्विन मुद्गल, प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार अर्चना तांबे, सरपंच सुषमा नलवडे, क्रांती बोराटे यांची उपस्थिती होती.
मकरंद अनासपुरे यांनी आपल्या ढंगात मार्गदर्शन करताना, तुझं आहे तुज पाशी पर जागा चुकलाशी, अशी समाजाची अवस्था झाल्याची खंत व्यक्त करताना, गावांचे उकिरडे होण्यास केवळ राजकीय वैमनस्यच कारणीभूत असल्याचे परखड मत त्यांनी मांडले. अश्विन मुद्गल यांनी मनोगत व्यक्त केले.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद