News Flash

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात राष्ट्रीय स्केटिंगपटू ठार

अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात येथील राष्ट्रीय स्केटिंगपटू ठार झाली.  समीक्षा राजेंद्र मांगले (वय १२, रा. थोरात चौक,  इचलकरंजी ) असे तिचे नाव आहे. तर तिची आई वैष्णवी मांगले या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
समीक्षा मांगले ही थोरात चौक परिसरात आपल्या कुटुंबीयासमवेत राहण्यास होती. तिने स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळवारी ती वडील राजेंद्र आणि आई वैष्णवी यांच्यासोबत मोटारसायकलवरून हुपरी येथे  कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम आटोपून इचलकरंजीकडे परतत होते. रेंदाळ येथील राम मंदिराजवळ आले असता त्यांची दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात समीक्षा ही जागीच ठार झाली. तर वैष्णवी मांगले या जखमी झाल्या. त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्केटिंगपटू समीक्षा हिचा अपघाती मृत्यू झाल्याने या भागात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2016 3:45 am

Web Title: national sketing player killed in tractor bike accident
टॅग : Killed,Kolhapur
Next Stories
1 शाळेच्या बसची धडक बसल्याने तरुण ठार
2 ऊसतोड मजूर महिलेचा गळा आवळून खून
3 वस्त्रोद्योगासाठीच्या तरतुदीने नाराजीचा सूर
Just Now!
X