News Flash

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्तेचे उच्चाटन करण्याचा निर्धार

मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.

राष्ट्रवादी काँग्रेस ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भोगावती सहकारी साखर कारखान्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्तेचे उच्चाटन करण्याचा आणि काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार रविवारी भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात परिते (ता. करवीर) येथील कृपासिंधू कार्यालयात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा आणि  याबाबतचे सर्व अधिकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, कृष्णराव किरुळकर यांना देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. भोगावती कारखान्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढवावी, असे मत अनेकांनी मांडले.

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, कृष्णराव किरुळकर, माजी अध्यक्ष संजय पाटील, बंडोपंत वाडकर, राधानगरी तालुका अध्यक्ष िहदुराव चौगले, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, उदयसिंह पाटील (कौलवकर) ए. डी. चौगले,  विश्वनाथ पाटील, शिवाजी तळेकर, भोगावती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बी. ए. पाटील, गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे, उदय पाटील (सडोलीकर) आदींची भाषणे झाली. काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी,  कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 12:57 am

Web Title: ncp vs shiv sena in kolhapur
Next Stories
1 कोल्हापुरात भाजप प्रवेशाची चढाओढ
2 एरवी तत्त्वाच्या गप्पा आता सर्व पक्ष खुले
3 हाणबरवाडी कोल्हापूर जिल्ह्यतील पहिले ‘रोकडरहित’ गाव
Just Now!
X