News Flash

घरात बसून पगार  घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना  नूतन संचालकांचा इशारा

कामावर न आल्यास पुढच्या महिन्यापासून पगार मिळणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

‘गोकुळ’संचालकांच्या पहिल्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : गोकुळ दूध संघात सेवेत असूनही काम न करता घरात बसून पगार घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांनी कामावर यावे, असा इशारा नूतन संचालकांनी पहिल्याच बैठकीत दिला.

गोकुळच्या अटीतटीच्या लढतीत सत्तांतर घडून आल्यानंतर विश्वास पाटील, अरुण डोंगळे हे माजी अध्यक्ष, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, नवीद मुश्रीफ, निशिकांत पाटील, अंजना रेडेकर यांच्यासह अन्य नव्या सत्तारूढ संचालकांनी संघात प्रवेश करून पहिली बैठक घेतली. दिवंगत अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे दूध उत्पादकांना लिटरला दोन रुपये दरवाढ देणे, संघामार्फत प्राणवायू प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. गैरहजर राहून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विषयाला तोंड फुटले. कामावर न आल्यास पुढच्या महिन्यापासून पगार मिळणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. नवीद मुश्रीफ म्हणाले, आम्ही गोकुळचे संचालक झालो आहोत, मालक नव्हे. संचालक म्हणून चैनी करणे नीतिमत्तेत बसत नाही. विश्वास्तांच्या भूमिकेतूनच काम करू. संघाचे मोठ्या हॉटेलमधील खाते बंद करा. हारतुरे, पुष्पगुच्छ, बाटलीबंद पाणी याला पायबंद घाला, अशी सूचना त्यांनी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 1:49 am

Web Title: new director warning to employees who are sitting at home and receiving salary akp 94
Next Stories
1 कापड विक्री थंडावली, सौदे रद्द
2 कर्नाटकातून महाराष्ट्राला होणारा प्राणवायूचा पुरवठा अनियमित
3 ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर; महाडिक गटाला धक्का
Just Now!
X