22 October 2020

News Flash

कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा दोनशेपार!

आज सकाळी एकूण १८२ सकारात्मक रुग्ण होते. त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५२ रुग्ण आढळले आहेत

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्य़ात २९ नवे रुग्ण

कोल्हापूर : करोनाच्या दृष्टीने कोल्हापूरसाठी आजची सकाळी दिलासादायक ठरली तर सायंकाळी प्राप्त अहवालामुळे चिंता वाढली. १६३८ रुग्णांचे अहवाल नकारात्मक आहेत. सकाळी ३४६ प्राप्त अहवालापैकी ३ अहवाल सकारात्मक होते. पण, गुरुवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार २९ करोना बाधितांचे अहवाल सकारात्मक आल्याने ही संख्या दोनशेच्या वर जात २११ झाली.

आज सकाळी एकूण १८२ सकारात्मक रुग्ण होते. त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. काल रात्री १२९५ आणि आज सकाळी ३४३ असे १६३८ अहवाल नकारात्मक आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना ठरली. त्याची चर्चा होत असताना संध्याकाळी २९ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आल्याने चिंता पुन्हा वाढली.

२७ हजार मजूर रवाना

शासनाने परप्रांतात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची सोय केली आहे. या अंतर्गत आजअखेर एकूण २० रेल्वेमधून २७ हजार ३७७ मजूर जिल्ह्यामधून मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील १४०१ मजुरांना घेऊन आज दुपारी  बिहारमधील अरारियाकडे रेल्वे रवाना झाली. रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १३ हजार ५५२ उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे ९ हजार ८२२, मध्य प्रदेशकडे १०६६, झारखंडकडे १४६० आणि राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 4:15 am

Web Title: number of coronavirus victims in kolhapur district is over two hundred zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार करताना सतेज पाटील यांची जीभ घसरली
2 कोल्हापूर जिल्ह्यात १९ नवे करोनाबाधित
3 मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे कोल्हापुरात मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणाची शक्यता वाढली
Just Now!
X