इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेले असताना मंगळवारी एकाचा बुडून मृत्यू झाला. नगाप्पा महादेव हरिजन (वय ११, रा. हत्ती चौक) असे मृताचे नाव आहे. नगाप्पा हरिजन, अडवय्या चंदू स्वामी (वय ११, रा. कुडचे मळा), योगेश सुतार (वय ११, रा. रोटरी क्लबजवळ) व अन्य एक (नाव समजू शकले नाही) हे चौघेजण नदीत आंघोळीसाठी गेले होते. या चौघांना पोहायला येत नव्हते. योगेश हा बुडत असताना तीन मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तेही पाण्यात बुडू लागले. यावेळी सुरेश चंद्रकांत मराठे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिघांना वाचविण्यात यश आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 4:06 am