कोल्हापूर, इचलकरंजी पालिकांची बेपर्वाई

दयानंद लिपारे, लोकसत्ता

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

कोल्हापूर : करोना टाळेबंदीच्या कालावधीत नितळ, स्वच्छ असलेली पंचगंगा नदी आणि करवीरनगरीचे जलसौंदर्य असलेला रंकाळा तलाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात सापडले  आहेत. जयंतीनाल्यासह १३ नाल्यांचे मैलामिश्रित सांडपाणी नदीमध्ये उघडपणे मिसळत आहे. उच्च न्यायालय, केंद्रीय हरित लवाद यांनी अनेकदा गंभीर ताशेरे मारूनही   औद्योगिक घटकांकडून होणारे नदीचे प्रदूषण थांबविण्यात कोल्हापूर महानगरपालिका वा इचलकरंजी नगरपालिके ला यश आलेले नाही.

कोल्हापूर जिल्ह्य़ाची जीवनदायिनी म्हणून पंचगंगा नदीकडे पाहिले जाते. १९८० पासून नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत चालली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींकडून अनेक तक्रारी राज्य शासन, पर्यावरण विभाग, उच्च न्यायालय, हरित लवाद अशा विविध ठिकाणी करण्यात आल्या. सन २०१२ मध्ये नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी येथे काविळीची साथ येऊन ४० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. हजारो लोकांना जलजन्य रोगाची लागण झाली. दरवर्षी नदीतील अगणित माणसे मृत्युमुखी पडतात, जलपर्णी साचल्यामुळे प्रदूषण वाढत राहते. याविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

‘करोना’त प्रदूषण थांबले

करोना संकट काळात सर्व घटकांवर विपरीत परिणाम झाले. अपवाद ठरली ती निसर्ग संपदा. करोना साथीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग बंद असल्याने पंचगंगा नदीसह जलाशय स्वच्छ, नितळ झाली होती. नदीचे हे लोभस सौंदर्य नागरिक, पर्यावरणप्रेमींना सुखावणारे ठरले. नदीची दरुगधी थांबल्याने लोकांना पाणी चांगल्या दर्जाचे मिळत होते. पण हा आनंद क्षणिक ठरला. करोनाची टांगती तलवार कायम असली तरी महापालिका, नगरपालिका, उद्योग यांच्या बेपर्वाईमुळे आता पुन्हा पंचगंगेला प्रदूषित पाण्याचा विळखा पडला आहे. कोल्हापूर नदीच्या मध्यवर्ती भागातून जयंती नाला वाहतो. हा नाला म्हणजे पूर्वी नदी होती असाही एक मतप्रवाह आहे. या नाल्यातील बरगे निसटले असल्याने त्यातील तसेच अन्य १३ नाल्यांतील मैलामिश्रित सांडपाणी उघडपणे नदीत मिसळत आहे. रंकाळा तलावात प्रदूषण वाढल्याने पाणी हिरवट बनले असल्याने सौंदर्याला बाधा आली आहे. इचलकरंजी येथे काळ्या ओढय़ातून औद्योगिक, रसायनयुक्त सांडपाणी बिनदिक्कत नदीत सामावत आहे. परिणामी पंचगंगा नदीचे पाणी काळसर रंगाचे, फेसाळलेले बनले आहेत. काही ठिकाणी मासे मृत झाले आहेत. नदीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोकाही निर्माण झाला आहे. नदीतील जैवविविधतेवरही याचा परिणाम होत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व नाल्यांची पाहणी करून पंचनामा केला. त्यामध्ये सर्वच नाल्यांतून सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे दिसत आले असल्याचे नमूद केले आहे.

पर्यावरणमंत्र्यांकडून अपेक्षा

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर, इचलकरंजी पालिकांना पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. यापूर्वी नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्यामुळे महापालिका, नगरपालिका यांचा वीज, पाणीपुरवठा खंडित, दंड अशी कारवाई करण्यात येऊनही परिणाम शून्य आहे. इचलकरंजीतील कावीळ साथीनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमून नियमित अहवाल देण्यास सांगितले होते. त्याकडे या सर्व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दिल्ली येथे हरित लवादासमोरील सुनावणीवेळी स्वच्छता उपासक म्हणवले जाणारे गतवर्षीचे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून पंचगंगा नदीचे प्रदूषण होणार नाही, असे कबूल केले होते. महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी ‘जयंती नाल्याचे बरगे दुरुस्त केले जात आहे. ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून १३ नाल्यांचे सांडपाणी मार्च २०२१ पर्यंत रोखले जाणार आहे’, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात यश आलेले नाही, अशी तक्रार दिलीप देसाई यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. नवे पर्यावरणमंत्री तरी पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.